66

marathi kavita – kunitari…

Posted January 24th, 2009 in Marathi Kavita by Sam

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…

7

Bagh tila sangun

Posted January 13th, 2009 in Marathi Kavita by Sam

बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

34

Marathi Mulga

Posted April 10th, 2008 in Marathi Kavita by Sam

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पीझ्झा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सीगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो

506

Best marathi poem

Posted August 7th, 2007 in Marathi Kavita by Sam
Tu Poli Mi Bhaat,
Tu Football Mi Laath

Tu Bashi Mi Cup,
Tu Ushi Mi Zhop.

Tu Ball Mi Bat,
Tu Undir Mi Cat…

Mi Mungla Tu Mungi,
Tu Saadi Mi Lungi..

Tu Love Mi Prem ,
Tu Photo Mi Frame..

Tu Doka Mi Kes,
Tu Saban Mi Fhes.

Tu Nisarga Mi Fiza,
Tu Kavita “Mi Maazha”

Tu Ghubad Mi Pankh,
Tu Vinchu Mi Dankh.

Tu Sambaar Mi Dosa
Tu Boxer Mi Thosa

Tu Kanik Mi Poli
Tu Aaushad Mi Goli.

Tu Petrol Mi Car,
Tu Daru Mi Bar.

Tu Dudh Mi Saai,
Tu Kes Mi Dye…..

Tu Chaha Mi Lassi,
Tu Kumkum Mi Jassi…

Tu Toop Mi Loni,
Tu Dravid Mi Dhoni….

Tu Barfi Mi Pedha,
Tu Bavlat Mi Veda…

Tu Computer Mi C.D.,
Tu Cigaratte Mi Bidi..

Tu Dahi Mi Loni,
Tu Kes Mi Pony

Tu Computer Me Mail
Tu Niranjan Me Tel

Tu Tiger Mi Lion
Tu Dadar Me Sion

Tu Takkal Mi Kes..
Tu Canteen Mi Mess

Tu Kes Me Konda,
Tu Dagad Me Dhonda.

तूं पोळी मी भात
तूं फुटबॊल मी लाथ

तूं बशी मी कप
तुं उशी मी झोप

तूं बॊल मी बॅट
तूं उंदीर मी कॅट

मी मुंगळा तूं मुंगी
तूं साडी मी लुंगी

तूं लव्ह मी प्रेम
तूं फोटो मी फ्रेम

तूं डोकं मी केस
तूं साबण मी फेस

तूं निसर्ग मी फिज़ा
तूं कविता “मी माझा”

तु घुबड मी पंख
तूं विंचू मी डंख

तूं सांबार मी दोसा
तूं बॊक्सर मी ठोसा

तूं कणिक मी पोळी
तूं औषध मी गोळी

तूं पेट्रोल मी कार
तूं दारू मी बार

तूं दूध मी साय
तूं केस मी डाय

तूं चहा मी लस्सी
तूं कुमकुम मी जस्सी

तूं तूप मी लोणी
तूं द्रविड मी ढोणी

तूं बर्फी मी पेढा
तूं बावळट मी वेडा

तूं कॊम्प्युटर मी सीडी
तूं सिगारेट मी विडी

तूं कोम्प्युटर मी मेल
तूं निरांजन मी तेल

तूं टायगर मी लायन
तूं दादर मी सायन

तूं टक्कल मी केस
तूं कॅन्टीन मी मेस

तूं केस मी कोंडा
तूं दगड मी धोंडा