ती सध्या काय करतेय ?… Part1

ऱंग रूप आणि देहाच्या पलिकडे
तो तीला सन्मानाने
कधी पहाणार ?
याची वाट बघतेय …

भर रस्त्यात तीची छेडछाड
तीच्यावरचे बलात्कार
कधी थांबणार ?
याची वाट बघतेय …

ऍसीड फेकून
तीच्यावर सूड न घेता
तीचा नकार पचवायला
कधी शिकणार ?
याची वाट बघतेय …

मर्दानगीच्या खोट्या कल्पनांतून बाहेर पडून
तो ‘माणूस’ कधी होणार ?
याची वाट बघतेय …
तोडुन सार्या जाती पातीच्या शृंखला तोडुन तिला
मला समानतावादी जीवन मिळेल का याची वाट पाहतेय
बलात्कारी पिडीत महीलांच्या परीवाराने त्याना परत सन्मान द्यावा याची वाट पाहतेय

Indian mentality screwed… Best one…

शादी हुई …

दोनों बहुत खुश थे!
स्टेज पर फोटो सेशन शुरू हुआ!
दूल्हे ने अपने दोस्तों का परिचय साथ खड़ी अपनी साली से करवाया
” ये है मेरी साली , आधी घरवाली ”
दोस्त ठहाका मारकर हंस दिए !

दुल्हन मुस्कुराई और अपने देवर का परिचय अपनी सहेलियो से करवाया
” ये हैं मेरे देवर ..आधे पति परमेश्वर ”
ये क्या हुआ ….?
अविश्वसनीय …अकल्पनीय!

Continue reading

Marathi Kavita – Ase aaple prem asave

Love You

असे आपले प्रेम असावे…!!
मी पहावे तू दिसावे,

नजरेत तुझे रुप साठवावे…..
मी लिहावे तू वाचावे,

स्वप्नांच्या जगात रमावे…..
मी रुसावे तू मनवावे,

भावनांना असेच जपावे…..
मी गावे तू गुणगुणावे,

प्रेमनगरीत सुखाने नांदावे…..
मी हसावे तू फसावे,

वेडं मन माझं तुला कळावे…..
जे शब्दात न मांडता,

डोळ्यांनी व्यक्त व्हावे…..
असे आपले प्रेम असावे…!!
असे आपले प्रेम असावे…!!

Marathi kavita – kunitari…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…

Marathi Kavita – Bagh tila sangun

बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

Page 1 of 212