Marathi Kavita – Ase aaple prem asave

Love You

असे आपले प्रेम असावे…!!
मी पहावे तू दिसावे,

नजरेत तुझे रुप साठवावे…..
मी लिहावे तू वाचावे,

स्वप्नांच्या जगात रमावे…..
मी रुसावे तू मनवावे,

भावनांना असेच जपावे…..
मी गावे तू गुणगुणावे,

प्रेमनगरीत सुखाने नांदावे…..
मी हसावे तू फसावे,

वेडं मन माझं तुला कळावे…..
जे शब्दात न मांडता,

डोळ्यांनी व्यक्त व्हावे…..
असे आपले प्रेम असावे…!!
असे आपले प्रेम असावे…!!

Marathi kavita – kunitari…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…

Marathi Kavita – Marathi Mulga

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पीझ्झा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सीगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो